एलिअन जीवसृष्टीची शक्यता?

कालचा सोमवार संपत नाही तोवर नव्याने सुरू झाला आहे. कारण, बातम्यांमध्ये अनपेक्षितपणे समोर आलेला आपला शेजारी ग्रह, शुक्र!


> भूपृष्ठीय तापमान शिसं वितळवण्याइतकं जास्त, म्हणजे ~ ४६५ अंश सेल्सिअस

> वातावरणातील ढग सल्फ्युरिक आम्लापासून बनलेले
> अतिशय घन वातावरण ज्याने मनुष्य त्यावर गेल्यास दृष्टीभ्रम निर्माण होऊन चक्रावण्याची शक्यताच जास्त
म्हणजे, सूर्यमालेतील सर्वात भयानक म्हणता यावा असा हा ग्रह - शुक्र.


हवाई येथील जे.सी.एम.टी. व चिली येथील ए.एल.एम.ए. या दुर्बिणी वापरून खगोलशास्त्रज्ञांना शुक्रावर 'फोस्फीन' वायूचा शोध लागल्याची बातमी काल प्रसिद्ध झाली आहे. या वायूची निर्मिती ज्या कारणांमुळे होऊ शकते ती - सूर्यप्रकाश, वीज, ज्वालामुखी, सर्व पडताळून पाहण्यात आली. ज्या प्रमाणात हा वायू सापडला आहे ते प्रमाण मिळणे यांपैकी एकाही कारणाने शक्य नसल्याने जी शक्यता समोर आली आहे तिने सर्वच खगोलप्रेमी अचंबित झाले आहेत, तसेच भविष्यातील शोधांसाठी उत्सुक देखील झाले आहेत.

हे कारण म्हणजे, 'फोस्फीन' वायूची निर्मिती या प्रमाणात करणारे सूक्ष्मजीव असण्याची दाट शक्यता! पृथ्वीवर आपल्याला असे सूक्ष्मजीव असल्याने फोस्फीन ची निर्मिती होण्याचे हे कारण माहित आहे. जर शुक्रावर या प्रकारचे सूक्ष्मजीव असतील तर लवकरच आपल्याला आपल्याच सूर्यमालेत 'परग्रह जीवसृष्टी' किंवा आपल्या लाडक्या शब्दांत सांगायचे तर 'एलिअन्स' सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सोनल थोरवे


स्त्रोत व अधिक माहिती:



Comments